आशिष देशमुखांमध्ये नेतृत्वाचे गुण, लोकांना जोडण्याची कला, देवेंद्र फडणवीस यांच्याकडून कौतुक

“आशिष देशमुखांमध्ये नेतृत्वाचे गुण, लोकांना जोडण्याची कला”, देवेंद्र फडणवीस यांच्याकडून कौतुक

| Updated on: Jun 18, 2023 | 3:54 PM

काँग्रेसमधून निलंबित झालेले नेते आशिष देशमुख यांनी आज भाजपमध्ये प्रवेश केला. यावेळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे उपस्थित होते. यावेळी देवेद्र फडणवीस यांनी आशिष देशमुख यांचे कौतुक केले.

नागपूर : काँग्रेसमधून निलंबित झालेले नेते आशिष देशमुख यांनी आज भाजपमध्ये प्रवेश केला. यावेळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे उपस्थित होते. यावेळी देवेद्र फडणवीस यांनी आशिष देशमुख यांचे कौतुक केले. “आशिष देशमुख सामान्य माणूस नाही, तर कलाकार आहे. त्यांच्याकडे माणसे जोडून ठेवण्याची कला आहे. देशमुख 2024 ची निवडणूक लढवणार नाही, असे सांगायला धाडस लागते. भाजप परिवार खुल्या मनाने देशमुख्यांना स्वीकारेल. आता देशमुख यांचा भाजप हाच शेवटचा पक्ष असेल. देशमुख यांच्याकडे प्रचंड गुण आहेत. त्यांनी काँग्रेस नेते व माजी सुनील केदार यांच्या तोंडाचं पाणी पळवले आहे. नागपूर जिल्हा भाजपचाच आहे, हे आता आम्ही दाखवून देऊ”, असं फडणवीस म्हणाले.

Published on: Jun 18, 2023 03:54 PM