योग्य वेळी करेक्ट कार्यक्रम होणार, पण सध्या ती वेळ नाही : देवेंद्र फडणवीस

| Updated on: May 02, 2021 | 7:10 PM

योग्य वेळी करेक्ट कार्यक्रम होणार, पण सध्या ती वेळ नाही : देवेंद्र फडणवीस

मुंबई : पंढरपूर मंगळवेढा पोटनिवडणुकीत भाजपचा विजय झाला. येथे भाजप उमेदवार समाधान आवताडे हे 3733 मतांच्या आघाडीने निवडून आले. पंढरपुरातील याच विजयाबद्दल बोलण्यासाठी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी पत्रकार परिषद घेतली. यावेळी त्यांनी विविध विषयांवर भाष्य केले.  “पंढरपुरात भारतीय जनता पक्षाला जनतेने निवडून दिलं. जमिनीशी जोडलेले व्यक्तिमत्व म्हणून समाधान आवताडे परिचित आहेत. प्रशांत परिचारक, उमेश परिचारक त्याच्यासोबत राहीले. भारतीय जनता पार्टी आणि सर्वजणांनी एकत्रित काम केले. या काळात आम्ही जनतेपर्यंत पोचून त्यांची मतं मिळवू शकलो. येथील बारा बलुतेदारांमध्ये नाराजी होती. तसेच शेतकऱ्यांची वीज तोडली गेली, त्याबद्दलसुद्दा सरकारविरोधात नाराजी होती. त्याचाच हा परिणाम आहे. हा विजय विठ्ठलामुळे मिळाला. हा विजय विठ्ठलाला समर्पित करतो,” असे देवेंद्र फडणवीस म्हणाले. तसेच योग्य वेळ आल्यानंतर राज्यात करेक्ट कार्यक्रम नक्की होणार, असेसुद्धा वक्तव्य त्यांनी केले.