“मविआ सरकारला निर्णय लकवा होता”, देवेंद्र फडणवीस यांच्या विधानावरून…
राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज अहमदनगर दौऱ्यावर आहेत. पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांच्या जयंतीनिमित्त ते चौंडमध्ये आले होते. यावेळी त्यांनी आपल्या भाषणा अनेक घोषणा करत मविआवर निशाणा साधला आहे. देवेंद्र फडणवीस यांनी अहमदनगरमधील 235 गावं जलयुक्त करण्याचं काम सुरु करण्याची घोषणा केली.
अहमदनगर : राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज अहमदनगर दौऱ्यावर आहेत. पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांच्या जयंतीनिमित्त ते चौंडमध्ये आले होते. यावेळी त्यांनी आपल्या भाषणात अनेक घोषणा करत मविआवर निशाणा साधला आहे. देवेंद्र फडणवीस यांनी अहमदनगरमधील 235 गावं जलयुक्त करण्याचं काम सुरु करण्याची घोषणा केली. शेतकऱ्यांना पीकविमा देण्याची पद्धत आम्ही बदलत आहोत. मंत्रालयातून थेट शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे जमा होणार. तसेच निळवंडे धरणाच्या डाव्या कालव्याची चाचणी पार पडली, असं देवेंद्र फडणवीस म्हणाले. काल मंडत्रिमंडळाची बैठक मुख्यमंत्र्यांनी घेतली. शेतकऱ्यांना 6 हजार रुपये जस केंद्र सरकार देतं राज्य सरकार देखील 6 हजार देणार, तसेच 1 रुपयात पीक कर्ज मिळणार, अशी घोषणा देवेंद्र फडणवीस यांनी केली. शेवटी त्यांनी मविआवरही टीका केली आहे. मविआ सरकारला निर्णय लकवा होता, असं देवेंद्र फडणवीस म्हणाले.