“शरद पवार यांची मुत्सद्देगिरी अन् शिंदे यांनी केली तर गद्दारी?” देवेंद्र फडणवीस यांचा राष्ट्रवादीला चिमटा
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या बंडला एक वर्ष पूर्ण झालं. याच निमित्ताने 20 जून रोजी ठाकरे गट आणि राष्ट्रवादी काँग्रेसने गद्दार दिन साजरा केला. यावरून उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी टीकास्र सोडलं आहे.
चंद्रपूर: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या बंडला एक वर्ष पूर्ण झालं. याच निमित्ताने 20 जून रोजी ठाकरे गट आणि राष्ट्रवादी काँग्रेसने गद्दार दिन साजरा केला. यावरून उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी टीकास्र सोडलं आहे.शिदें गटावर ठाकरे गट कायम बेईमानी अशी टीका करत असते. पण मला आश्चर्च वाटलं की, राष्ट्रवादीनेही गद्दारी म्हणून शिंदे गटाला डिवचलं. वो करे तो रासलीला, मै करू तो कॅरेक्टर ढिला, तशी अवस्था आहे. 1978 मध्ये वसंतदादा पाटील यांच्या मंत्रिमंडळातून शरद पवार 40 आमदार घेऊन बाहेर पडले आणि भाजपसोबत मुख्यमंत्री झाले. हे सरकार दोन वर्ष चाललं. इंदिराजींनी ते सरकार बरखास्त केलं नसतं, तर पाच वर्ष चाललं असतं. तेव्हा त्यांनी केली तर ती मुत्सद्देगिरी आणि तेच शिंदे यांनी केले तर गद्दारी? हा कुठला न्याय, असं फडणवीस म्हणाले.
Published on: Jun 26, 2023 01:21 PM
Latest Videos