विरोधकांचे फक्त मगरीचे आश्रू आहेत, फडणवीस यांचा विरोधकांवर हल्ला
महाविकास आघाडीच्या आमदारांनी विधानभवनाचा परिसर दणाणून सोडला. त्यानंतर शेतकऱ्यांच्या मुद्यावरून विरोधकांनी सभात्याग केला. त्यावर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विरोधकांना खडे बोल सुनावले
मुंबई : अवकाळी पाऊस आणि गारपिढीमुळे राज्यातील अनेक शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहे. त्यांना मदत मिळालीच पाहिजे. लवकरात लवकर शेतकऱ्यांच्या पिकांचे पंचनामे झालेच पाहिजेत अशा मागण्या सभागृहात विरोधकांनी लावून धरल्या. त्याचबरोबर बळीराजाला मदत मिळालीच पाहिजे… मंत्री तुपाशी शेतकरी उपाशी… नुकसान भरपाई जाहीर करा, नाहीतर खुर्च्या खाली करा… अशा घोषणांनी महाविकास आघाडीच्या आमदारांनी विधानभवनाचा परिसर दणाणून सोडला. त्यानंतर शेतकऱ्यांच्या मुद्यावरून विरोधकांनी सभात्याग केला. त्यावर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विरोधकांना खडे बोल सुनावले. तसेच विरोधकच शेतकऱ्यांच्या मुद्द्यावर राजकारण करत असून विरोधकांचे हे मगरीचे आश्रू आहेत असा घणाघात त्यांनी केला. त्यांना माहित ही आहे की अनुदानाचे पैसे आम्ही दिले. 7 हजार कोटी रूपये आता पर्यंत आम्ही शेतकऱ्यांना दिले आहेत.