Video | सरकारच्या नाकर्तेपणामुळे ओबीसी समाजावर पुन्हा अन्याय, देवेंद्र फडणवीसांचा आरोप

| Updated on: May 29, 2021 | 8:56 PM

Video | सरकारच्या नाकर्तेपणामुळे ओबीसी समाजावर पुन्हा अन्याय, देवेंद्र फडणवीसांचा आरोप

मुंबई: राज्य सरकारची फेरविचार याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळल्यामुळे ओबीसी समाजाचे राजकीय आरक्षण संपुष्टात आले आहे. केवळ आणि केवळ राज्य सरकारच्या नाकर्तेपणामुळे ओबीसी समाजावर पुन्हा अन्याय झाला आहे, असं विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis) म्हणालेत. यासंदर्भात राज्य सरकारकडे वारंवार पाठपुरावा करून, वारंवार स्मरणपत्रे पाठवूनसुद्धा कोणतीही कारवाई राज्य सरकारने केली नाही. आतातरी नाकर्तेपणा सोडून जागे व्हा, असे पत्र माजी मुख्यमंत्री आणि विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पाठविले.

 

Published on: May 29, 2021 08:56 PM