सुप्रिया सुळे यांच्या भावी मुख्यमंत्र्याच्या बॅनरवर देवेंद्र फडणवीस म्हणाले, … ही राष्ट्रवादीची परंपरा
VIDEO | मुख्यमंत्री पदावरून राष्ट्रवादीत पोस्टरवॉर, सुप्रिया सुळे यांच्या भावी मुख्यमंत्री पोस्टरवर काय म्हणताय देवेंद्र फडणवीस?
मुंबई : गेल्या काही दिवसात प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, विरोधी पक्षनेते अजित पवार आणि आता खासदार सुप्रिया सुळे या तिनही राष्ट्रवादी नेत्यांचे भावी मुख्यमंत्री असे बॅनर लागल्याचे पाहायला मिळाले आणि राजकीय वर्तुळात यावर आरोप-प्रत्यारोपांची मालिका देखील सुरू असल्याचे बघायला मिळत आहे. अशातच आता राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी खासदार सुप्रिया सुळे यांच्या नावाने भावी मुख्यमंत्री म्हणून लागलेल्या बॅनरवर भाष्य केले नाही. भावी मुख्यमंत्री, भावी पंतप्रधान म्हणायची राष्ट्रवादीत पद्धत आणि परंपरा आहे. असे असले तरी माझ्या त्यांना शुभेच्छा आहे, असे म्हणत देवेंद्र फडणवीस यांनी सुप्रिया सुळे यांच्या भावी मुख्यमंत्री पोस्टवर टीका केली आहे. तर यावेळी त्यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर निशाणा साधत ते म्हणाले उद्धव ठाकरे कधी मुख्यमंत्री होतील, असे वाटले होते का?