2019 ला मोदींच्या फोटोवर निवडून आले आणि नंतर... ; फडणवीसांचा उद्धव ठाकरेंवर हल्लाबोल

2019 ला मोदींच्या फोटोवर निवडून आले आणि नंतर… ; फडणवीसांचा उद्धव ठाकरेंवर हल्लाबोल

| Updated on: Sep 22, 2022 | 12:14 PM

उद्धव ठाकरेंची निराशा बोलत आहे.  2019 ला मोदींचा फोटो दाखवून हे निवडून आले. मात्र निवडून आल्यानंतर त्यांनी राष्ट्रवादी, काँग्रेससोबत आघाडी केल्याची टीका देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे.

मुंबई : बुधवारी शिवसेनेचा मेळावा पार पडला. या मेळाव्यात शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनी (Uddhav Thackeray) शिंदे गट आणि भाजपावर (BJP) जोरदार टीका केली. आता या टीकेला देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी जोरदार प्रत्युत्तर दिले आहे. उद्धव ठाकरेंची निराशा बोलत आहे.  2019 ला मोदींचा फोटो दाखवून हे निवडून आले. मात्र निवडून आल्यानंतर त्यांनी राष्ट्रवादी, काँग्रेससोबत आघाडी केली. आमच्या पाठीत खंजीर खुपसला. मग त्यावेळी त्यांनी का राजीनामा देऊन परत निवडणूक घेतली नाही? असा सवाल देवेंद्र फडणवीस यांनी केला आहे.  तसेच 2019 ला  मविआने मला संपवण्याचा प्रयत्न केला. मात्र ते तेव्हाही मला संपवू शकले नाहीत आणि पुढेही संपवू शकणार नाहीत असं फडणवीस यांनी म्हटलं आहे. दुसरीकडे भाजपासोबतच शिंदे गटाच्या नेत्यांनी देखील उद्धव ठाकरेंवर जोरदार निशाणा साधाला आहे.

 

 

 

 

Published on: Sep 22, 2022 12:14 PM