DEVENDRA FADNAVIS : देवेंद्र फडणवीस यांचा पक्षपातीपणा, माझं वाचन कमी.. का म्हणाल्या असं सुप्रिया सुळे

DEVENDRA FADNAVIS : देवेंद्र फडणवीस यांचा पक्षपातीपणा, माझं वाचन कमी.. का म्हणाल्या असं सुप्रिया सुळे

| Updated on: Jan 12, 2023 | 1:48 PM

माजी मंत्री हसन मुश्रीफ यांच्यावरील कारवाईबद्दल बोलताना कोणत्याही कारवाईला आम्ही सहकार्य करू असे सुप्रिया सुळे म्हणाल्या.

पुणे : राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे ( SUPRIYA SULE ) यांनी पुण्यातील ( PUNE ) लाल महाल ( LAL MAHAL )  येथील माँसाहेब जिजाऊ ( MASAHEB JIJAU ) यांच्या पुतळ्यास अभिवादन केले. यावेळी माजी मंत्री हसन मुश्रीफ ( HASAN MUSHRIF ) यांच्यावरील कारवाईबद्दल बोलताना त्यांनी कोणत्याही कारवाईला आम्ही सहकार्य करू असे सांगितलं आहे.

भाजपच्या वॉशिंग मशीनमध्ये जो भाजपात गेला तो साफ होतो. त्याचे गुन्हे माफ होतात. तर, विरोधकांना खोट्या गुन्हयात अडकवले जाते अशी टीका केली. देवेंद्र फडणवीस यांनी पक्षपातीपणा करू नये अशी टीका केली.

भाजप नेत्या चित्रा वाघ आणि अभिनेत्री उर्फी जावेद यांच्यातील वादावर माझे वाचन खूप कमी आहे, मला खरच त्याबाबत माहित नाही असे सांगत प्रतिक्रिया देण्याचे टाळले.

Published on: Jan 12, 2023 01:48 PM