समीर वानखेडे यांच्यावरून नाना पटोले यांचा भाजपवर आरोप, तर फडणवीस म्हणतात, “नाना पटोले लादेनला भेटले होते”!
एनसीबी मुंबई झोनलचे माजी डायरेक्टर समीर वानखेडे यांची सध्या सीबीआय चौकशी होत आहे. समीर वानखेडे यांनी आर्यन खान प्रकरणात अभिनेता शाहरुख खान याच्याकडे 25 कोटींची खंडणी मागितल्याचा गंभीर आरोप करण्यात आला आहे.
मुंबई : एनसीबी मुंबई झोनलचे माजी डायरेक्टर समीर वानखेडे यांची सध्या सीबीआय चौकशी होत आहे. समीर वानखेडे यांनी आर्यन खान प्रकरणात अभिनेता शाहरुख खान याच्याकडे 25 कोटींची खंडणी मागितल्याचा गंभीर आरोप करण्यात आला आहे. या संपूर्ण घटनेवरून काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी भाजप आणि संघावर गंभीर आरोप केले आहत. “समीर वानखेडे यांच्याबाबत असं काय घडलं की, मोहन भागवतांना भेटल्यानंतर चौकशीचा ससेमिरा मागे लागला. यामध्ये काही ना काही गोष्टी समोर येतील.यामध्ये काही ना काही लपलेलं आहे. काही गोष्टी संशयास्पद आहेत”, असं पटोले म्हणालेत. त्यांच्या या विधानानंतर, “नाना पटोले यांनी लादेनची भेट घेतली होती”, असा टोला उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी लगावला आहे.