'ही अजितदादांची करामत, 40 वर्षांनंतर शरद पवारांना....,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस

‘ही अजितदादांची करामत, 40 वर्षांनंतर शरद पवारांना….,’ काय म्हणाले देवेंद्र फडणवीस

| Updated on: Feb 24, 2024 | 7:40 PM

मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी ईव्हीएमवर पुन्हा भाष्य केले आहे. यावर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मजेशीर प्रतिक्रीया व्यक्त केली आहे. त्यांना पुन्हा ईव्हीएम पटेल अशा शब्दात त्यांनी राज ठाकरे यांना टोमणा मारला आहे. कंत्राटी पदांची भरती थांबविता येणार नाही, काही पदांचा नेचर तसा असल्याने ही पदे कंत्राटी पद्धतीनेच भरली जातील असे फडणवीस यांनी म्हटले आहे.

पुणे | 24 फेब्रुवारी 2024 : शरद पवार गटाला तुतारी मिळाल्यानंतर रायगड येथे जाऊन त्यांनी चिन्हाचं अनावरण केले आहे. ही खरं तर अजितदादांची करामत आहे की 40 वर्षांनंतर शरद पवारांना शिवरायांची आठवण आली आहे. आता तुतारी कुठे वाजते,कशी वाजते, किती वाजते हे नंतर कळेलच असेही उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले आहे. ज्या डिपार्टमेंटमध्ये गेली २० ते २५ वर्षे कंत्राटी पदे आहेत. तेथे कंत्राटी पदाची भरती होईलच हे ज्यावेळी कंत्राटी पदांच्या भरतीचा निर्णय सरकारने रद्द केला होता त्याचवेळी स्पष्ट केले होते. त्यात नवीन काहीच नाही असेही त्यांनी सांगितले. मोठा ड्रग्जच्या साठा शोधून काढल्याने पुणे पोलिसाचं अभिनंदन केले पाहीजे. ज्याप्रकारे हा साठा त्यांनी हुडकून काढले. आपण मागेच पोलिसांनी ड्र्ग्ज प्रकरणातल्या सर्व बॅकवर्ड लिंकेज आणि फॉरवर्ड लिंकेज शोधून काढा. त्यातूनच हा साठा सापडला आहे. आता राष्ट्रीय नार्कोटीज कंट्रोलला आम्ही कळविले असून देशभरात कारवाई सुरु असल्याचे त्यांनी सांगितले. राज ठाकरे यांना EVM मागे पटले होते ना, आता नाही पटले का, तर मग नंतर पुन्हा पटेल असेही देवेंद्र फडणवीस म्हणाले.

 

Published on: Feb 24, 2024 07:37 PM