इर्शाळवाडी दुर्घटना कशी, कधी घडली? देवेंद्र फडणवीस यांचं विधानसभेत निवेदन; सांगितला घटनाक्रम…
रायगडमधील खालापूर तालुक्यातील इर्शाळवाडी गावावर दु:खाचा डोंगर कोसळला. या गावात दरड कोसळली असून अनेक कुटुंब ढिगाऱ्याखाली अडकले आहेत. या दुर्घटनेबाबत राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत निवेदन दिले.
मुंबई, 20 जुलै 2023 | रायगडमधील खालापूर तालुक्यातील इर्शाळवाडी गावावर दु:खाचा डोंगर कोसळला. या गावात दरड कोसळली असून अनेक कुटुंब ढिगाऱ्याखाली अडकले आहेत. बुधवारी रात्री 10.30 च्या सुमारास ही घटना घडली. ढिगाऱ्याखालून 75 जणांना बाहेर काढण्यात बचाव पथकाला यश आले आहे. तर, आतापर्यंत 10 जणांचे मृतृ झाला आहे. या घटनेवर आज विधिमंडळात चर्चा झाली.राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी इर्शाळवाडी दुर्घटनेबाबत विधानसभेत निवेदन दिले. उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी सांगितले की, “दुर्घटनेमुळे 22 ते 28 कुटुंब बाधित झाले आहेत. आतापर्यंत 10 जणांचे मृतदेह सापडले आहेत. तर, 21 जण जखमी झाले आहेत. इर्शाळवाडीतील 70 जण सुखरूप आहेत. ते इतर कार्यक्रमांसाठी गावाबाहेर असल्याची माहिती प्रशासनाला मिळाली आहे.”

हरीभाऊ बागडेंच्या हेलिकॉप्टरला अपघात; व्हिडिओ व्हारायल

साईबाबांच्या पालखी सोहळ्यात आदित्य ठाकरेंना ढोल वाजवण्याचा मोह अनावर

पंतप्रधान मोदींच्या दौऱ्यानिमित्त नागपूरात जोरदार बॅनरबाजी

महाराष्ट्रासह मुंबईकरांसाठी मोठी बातमी, पुढील 4 ते 5 दिवस राज्यात...
