मंत्रिमंडळ विस्ताराचा मुहुर्त निघाला? देवेंद्र फडणवीस म्हणतात, “मुख्यमंत्री शिंदे…”
मंत्रिमंडळ विस्तार कधी होणार याकडे सर्वांचं लक्ष लागून आहे. त्यातच मंत्रिमंडळ विस्तारावर चर्चा करण्यासाठी शिंदे-फडणवीसांनी दिल्ली वारी केली. तर, मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्र्यांची अमित शाहांशी दिल्लीत चर्चा झाल्याची माहिती समोर येत आहे. याच पार्श्वभूमीवर देवेंद्र फडणवीस यांनी वक्तव्य केलं आहे.
नागपूर: मंत्रिमंडळ विस्तार कधी होणार याकडे सर्वांचं लक्ष लागून आहे. त्यातच मंत्रिमंडळ विस्तारावर चर्चा करण्यासाठी शिंदे-फडणवीसांनी दिल्ली वारी केली. तर, मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्र्यांची अमित शाहांशी दिल्लीत चर्चा झाल्याची माहिती समोर येत आहे. दिल्लीच्या बैठकीत मंत्रिमंडळ विस्तारावर चर्चा झाल्याची सूत्रांची माहिती मिळाली आहे. याच पार्श्वभूमीवर देवेंद्र फडणवीस यांनी वक्तव्य केलं आहे. मंत्रीमंडळ विस्तार होणारंच आहे. केव्हा होणार हे मुख्यमंत्री सांगतील, असं देवेंद्र फडणवीस म्हणाले. तसेच शाहा यांच्या भेटीत नेमकी कशावर चर्चा झाली याची माहिती देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे. शिवसेना आणि भाजप सर्व निवडणूका एकत्र लढवण्यावर चर्चा झाली आणि तालुका – जिल्हा स्तरावर दोन्ही पक्षात समन्वय ठेवण्याचा निर्णय झाला आहे, असं फडणवीस म्हणाले.
Published on: Jun 05, 2023 03:24 PM
Latest Videos