Video : पंकजाताई नाराज नाहीत, आम्ही कायम संपर्कात असतो -पंकजा मुंडे

Video : पंकजाताई नाराज नाहीत, आम्ही कायम संपर्कात असतो -पंकजा मुंडे

| Updated on: Jun 13, 2022 | 4:29 PM

विधान परिषद निवडणुकीत पंकजा मुंडे (Pankaja Munde) यांना संधी मिळण्याची शक्यता वर्तवली जात होती. त्याच्या नावाची चर्चाही जोरात झाली. मात्र, नेहमीप्रमाणे त्यांचं नाव यावेळीही मागे पडलं. त्यामुळे पुन्हा एकदा पंकजा मुंडे समर्थकांमध्ये नाराजी पसरली आहे. राज्यात विविध भागात पंकजा मुंडे समर्थक रस्त्यावर उतरलेले पाहायला मिळाले. रविवारी विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर (Pravin Darekar) बीड जिल्हा दौऱ्यावर […]

विधान परिषद निवडणुकीत पंकजा मुंडे (Pankaja Munde) यांना संधी मिळण्याची शक्यता वर्तवली जात होती. त्याच्या नावाची चर्चाही जोरात झाली. मात्र, नेहमीप्रमाणे त्यांचं नाव यावेळीही मागे पडलं. त्यामुळे पुन्हा एकदा पंकजा मुंडे समर्थकांमध्ये नाराजी पसरली आहे. राज्यात विविध भागात पंकजा मुंडे समर्थक रस्त्यावर उतरलेले पाहायला मिळाले. रविवारी विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर (Pravin Darekar) बीड जिल्हा दौऱ्यावर असताना यांचा ताफा अडवण्याचा प्रयत्नही पंकजा मुंडे समर्थकांनी केला. अशावेळी पत्रकारांनी विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांना पंकजा मुंडे नाराज आहेत का? असा सवाल केला. त्यावर फडणवीस यांनी भाजप एक परिवार आहे आणि आम्ही सगळे या परिवाराचे सदस्य आहोत, असं उत्तर दिलं.

Published on: Jun 13, 2022 04:29 PM