“…अन् ‘ती’ चुक मुख्यमंत्री शिंदे यांनी मान्य केली”, देवेंद्र फडणवीस यांचा खुलासा
'राष्ट्रामध्ये मोदी आणि महाराष्ट्रात शिंदे' या जाहिरातीमुळे राज्याच्या राजकारणात मोठा वाद निर्माण झाला होता. या मुद्यावर पुन्हा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणीवस भाष्य केलं. रिपब्लिक टीव्हीला दिलेल्या मुलाखतीत देवेंद्र फडणवीस बोलत होते.
मुंबई: ‘राष्ट्रामध्ये मोदी आणि महाराष्ट्रात शिंदे’ या जाहिरातीमुळे राज्याच्या राजकारणात मोठा वाद निर्माण झाला होता. त्यामुळे शिंदे फडणवीस यांच्यात मतभेद झाल्याच्या चर्चेला उधाण आलं. दुसऱ्याच दिवशी फडणवीसांबरोबरचा फोटो असणारी जाहिरात छापून या प्रकरणावर पडदा टाकण्याचा प्रयत्न शिवसेने केला. दरम्यान, या मुद्यावर पुन्हा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणीवस भाष्य केलं. रिपब्लिक टीव्ही’ला दिलेल्या मुलाखतीत देवेंद्र फडणवीस बोलत होते. “जाहिरात छापून आल्यानंतर दुसऱ्याच दिवशी एकनाथ शिंदेंनी माझ्याशी संवाद साधला आणि चूक मान्य केली. आमच्या काही लोकांनी चूक केली, असं एकनाथ शिंदे म्हणाले. मी तुम्हाला स्पष्टपणे सांगू इच्छितो की, एकनाथ शिंदे आणि माझ्यात ज्याप्रकारचं घट्ट संबंध आहेत, ते कदाचितच युतीच्या सरकारमध्ये दिसतात. कारण मी कधीही एकनाथ शिंदे यांचा मान, सन्मान आणि शिष्टाचार मोडत नाही आणि तेही मी उपमुख्यमंत्री आहे, याची जाणीव मला कधीच होऊ देत नाहीत,” असं फडणवीस म्हणाले.