“माजी मित्राच्या मानसिक स्थितीवर दया येते, अशा अवस्थेत…”, देवेंद्र फडणवीस यांची उद्धव ठाकरे यांच्यावर टीका
ठाकरे गटाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे दोन दिवसीय विदर्भ दौऱ्यावर होते. काल त्यांनी नागपूर येथे कार्यकर्त्यांचा मेळावा आयोजित केला होता. या मेळाव्यात त्यांनी देवेंद्र फडणवीस म्हणजे नागपूरला लागलेले कलंक आहेत, अशी टीका केली. यावर देवेंद्र फडणवीस यांनी बोचरी प्रतिक्रिया दिली आहे.
मुंबई: ठाकरे गटाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे दोन दिवसीय विदर्भ दौऱ्यावर होते. काल त्यांनी नागपूर येथे कार्यकर्त्यांचा मेळावा आयोजित केला होता. या मेळाव्यात त्यांनी देवेंद्र फडणवीस म्हणजे नागपूरला लागलेले कलंक आहेत, अशी टीका केली. यावर देवेंद्र फडणवीस यांनी बोचरी प्रतिक्रिया दिली आहे. देवेंद्र फडणवीस म्हणाले, “खरं म्हणजे मला या गोष्टीचं अत्यंत दुःख आहे की, आमचे आजचे विरोधक आणि माजी मित्र यांच्यावर आताच्या राजकीय परिस्थितीचा फारच विपरित परिणाम झाला आहे असं दिसतंय. त्यामुळे त्यांना मानसोपचारतज्ज्ञांचा सल्ला घ्यावा लागेल अशी परिस्थिती पाहायला मिळत आहे.अशा मानसिकतेतून एखादी व्यक्ती बोलत असेल तर मला वाटतं की त्यावर प्रतिक्रिया देणं योग्य नाही. कारण त्यांची मानसिक स्थिती आपण सर्वांनी समजून घेतली पाहिजे. त्यांच्या मानसिक स्थितीवर, व्यवहारावर मला दया येतेय. त्यांनी एखाद्या मानसोपचारतज्ज्ञाकडे जायला हवं.”