Special Report | “सापनाथ, नागनाथ एकत्र आले तरी…”, केजरीवाल-ठाकरे भेटीवर देवेंद्र फडणवीस यांचा हल्लाबोल
लोकसभा निवडणुकीसाठी सर्वच पक्षांनी तयारी सुरु केली आहे. त्याचाच एक भाग म्हणून मातोश्रीवर हालचाली सुरु झाल्या आहेत. दिल्लीचे मुख्यमंत्री आणि आपचे प्रमुख अरविंद केजरीवाल यांनी उद्धव ठाकरे यांची भेट घेतली. या भेटीनंतर देवेंद्र फडणवीस यांनी केजरीवाल आणि ठाकरे यांचा उल्लेख सापनाथ आणि नागनाथ म्हणून केला आहे.
मुंबई : लोकसभा निवडणुकीसाठी सर्वच पक्षांनी तयारी सुरु केली आहे. त्याचाच एक भाग म्हणून मातोश्रीवर हालचाली सुरु झाल्या आहेत. दिल्लीचे मुख्यमंत्री आणि आपचे प्रमुख अरविंद केजरीवाल यांनी उद्धव ठाकरे यांची भेट घेतली. या भेटीनंतर देवेंद्र फडणवीस यांनी केजरीवाल आणि ठाकरे यांचा उल्लेख सापनाथ आणि नागनाथ म्हणून केला आहे.”सापनाथ आणि नागनाथ एकत्र येऊन एकच विष पसरवणार आहे. ज्यांच्यासोबत पाच वर्षे होते त्यांच्याशी बोलायचं नाही. त्यांना वेळ द्यायचा नाही. आमच्यासाठी मातोश्रीचे दरवाजे बंद केले आणि बाळासाहेबांनी जन्मभर ज्यांचा विरोध केला त्यांना बटाटेवडे भरवायचे”, असा टोला देवेंद्र फडणवीस यांनी लगावला. देवेंद्र फडणवीस यांच्या या वक्तव्याला संजय राऊत यांनी उत्तर दिलं आहे. “सापनाथ आणि नागनाथ यांची या देशात पूजा केली जाते. त्यामुळे तुम्हाला त्यात त्रास व्हायचं काही कारण नाही. तुम्ही हिंदू आहात ना?, असा सवाल संजय राऊत यांनी यावेळी उपस्थित केला आहे. “कितीही सापनाथ आणि नागनाथ एकत्र आले तरी सरकार आमचचं येणार आहे. कारण तुमच्याकडे सापनाथ आणि नागनाथ असले, तरी आमच्याकडे एकनाथ आहे. त्यामुळे आमचचं युतीचं सरकार येणार”, असं उदय सामंत म्हणाले. दम्यान गेल्या काही दिवसांपासून विरोधकांच्या भेटीगाठी वाढत आहेत. विरोधकांकडून ताकद दाखवण्याचा प्रयत्न सुरु आहे. मात्र टीका-टिप्पणीही जोरात सुरु आहे. त्यामुळे पुढे काय होईल हे कोणालाच सांगता येणार नाही.यासाठी पाहा यासंदर्भातील स्पेशल रिपोर्ट…