Special Report | फडणवीसांकडून बैठका, नेमका प्लॅन काय?

Special Report | फडणवीसांकडून बैठका, नेमका प्लॅन काय?

| Updated on: Jun 27, 2022 | 11:07 PM

एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांची बड्योद्यात भेट झाल्याचे सांगण्यात आले आहे. त्यामुळे येत्या काळात देवेंद्र फडणवीस यांची भूमिका काय असणार याकडेच शिंदे गटाचेच नाही तर राज्याचे लक्ष लागून राहिले आहे.

शिवसेनेच्या एकनाथ शिंदे यांनी हिंदुत्वाचा मुद्दा उपस्थित करून बंडखोरी केली. त्यांना शिवसेनेच्या आमदार फोडतच शिंदे गटाचा दावा शिवसेनेचे चिन्ह आपलेच आहे असा दावा करण्यात आला. या सगळ्या चित्रात भाजप आणि शिवसेना आले असले तरी भाजपचा मुख्य चेहरा आणि मी पुन्हा येईन असा विश्वास दाखवणार माजी मुख्यमंत्री आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांची मात्र या सगळ्या राजकीय नाट्यात अजून एन्ट्री झाली नाही. मात्र देवेंद्र फडणवीसांच्या हालचाली आता सुरू झाल्याचे दिसत आहे. एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांची बड्योद्यात भेट झाल्याचे सांगण्यात आले आहे. त्यामुळे येत्या काळात देवेंद्र फडणवीस यांची भूमिका काय असणार याकडेच शिंदे गटाचेच नाही तर राज्याचे लक्ष लागून राहिले आहे.

Published on: Jun 27, 2022 11:07 PM