निधी वाटपाच्या प्रश्नावर देवेंद्र फडणवीस भडकले; म्हणाले, ‘हा शहाणपणा तेव्हाच्या सरकारला शिकवायला हवा होता’
अर्थमंत्री अजित पवार यांनी राष्ट्रवादी आणि शिंदे गटाच्या आमदारांना भरभरून निधी दिला. मात्र, विरोधकांना निधी वाटपात दुजाभाव केल्याचा आरोप विरोधकांनी केला आहे. या घटनेचे आज विधान परिषदेत पडसाद उमटले. विधान परिषदेत अंबादास दानवे यांनी निधी वाटपाचा मुद्दा लावून धरला. याच पार्श्वभूमीवर देवेंद्र फडणवीस यांनी खडेबोल सुनावले आहेत.
मुंबई, 24 जुलै 2023 | अर्थमंत्री अजित पवार यांनी राष्ट्रवादी आणि शिंदे गटाच्या आमदारांना भरभरून निधी दिला. मात्र, विरोधकांना अत्यंत कमी निधी दिला आहे. अजितदादांनी निधी वाटपात दुजाभाव केल्याचा आरोप विरोधकांनी केला आहे. या घटनेचे आज विधान परिषदेत पडसाद उमटले. विधान परिषदेत अंबादास दानवे यांनी निधी वाटपाचा मुद्दा लावून धरला. याच पार्श्वभूमीवर देवेंद्र फडणवीस यांनी खडेबोल सुनावले आहेत. ते म्हणाले की, “अडीच वर्ष जेव्हा उद्धव ठाकरे यांचं महाविकास आघाडीचं सरकार होतं, तेव्हा आम्हाला एक नवा पैसा मिळाला नाही. कुणाला किती निधी द्यायचा हे राज्याचा प्रमुख ठरवतो. त्यांच्या सही शिवाय एक नवा पैसा कुणाला खर्च करता येत नाही. अडीच वर्षात एक फुटकी कवडीही आम्हाला दिली गेली नाही. बाकीच्यांना मिळाले ना. कोव्हिड फक्त विरोधी पक्षासाठी होता. सत्ताधाऱ्यांना नव्हता. मला सांगा तुम्ही जे स्थगिती आली, स्थगिती आली म्हणता ते पैसे कुठले आहेत? इथलेच पैसे आहेत ना. अडीच वर्षात एकाही आमदाराला फुटकी कवडी मिळाली नाही. विरोधी पक्षाच्या आमदाराने जे शहाणपण आम्हाला शिकवलं आहे. ते आधीच्या सरकारला शिकवलं असतं तर कदाचित ही परिस्थिती आलीच नसती.”