नागपूरचा कलंक उद्धव ठाकरे यांचा वार, देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार; म्हणाले, कलंकीचा काविळ...

“नागपूरचा कलंक” उद्धव ठाकरे यांचा वार, देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार; म्हणाले, “कलंकीचा काविळ…”

| Updated on: Jul 11, 2023 | 7:58 AM

ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे हे दोन दिवस विदर्भ दौऱ्यावर होते. उद्धव ठाकरे यांची काल नागपुरात सभा झाली. या सभेत त्यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर निशाणा साधला. फडणवीस म्हणजे नागपूरला लागलेला कलंक आहे, असं उद्धव ठाकरे म्हणाले. त्यांच्या याच टीकेला आता देवेंद्र फडणवीस यांनी प्रत्युत्तर दिलं आहे.

मुंबई : ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे हे दोन दिवस विदर्भ दौऱ्यावर होते. उद्धव ठाकरे यांची काल नागपुरात सभा झाली. या सभेत त्यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर निशाणा साधला. फडणवीस म्हणजे नागपूरला लागलेला कलंक आहे, असं उद्धव ठाकरे म्हणाले. त्यांच्या याच टीकेला आता देवेंद्र फडणवीस यांनी प्रत्युत्तर दिलं आहे. देवेंद्र फडणवीस यांनी ट्विटरवर उद्धव ठाकरे यांचा व्हिडीओ शेअर करत प्रत्युत्तर दिलं आहे. या व्हिडीओत उद्धव ठाकरे हे काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसवर टीका करताना दिसत आहेत.उद्धव ठाकरेंच्या टीकेवर प्रत्युत्तर देताना फडणवीसांनी ‘कलंकीचा काविळ’असा उल्लेख केला आहे. देवेंद्र फडणवीस आपल्या ट्विटमध्ये काय म्हणाले यासाठी पाहा हा व्हिडीओ…

 

Published on: Jul 11, 2023 07:58 AM