“तो माझा आनंद फार काळ टिकला नाही, कारण…”, देवेंद्र फडणवीस यांचा मोठा गौप्यस्फोट
एकनाथ शिंदे यांनी देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत हातमिळवणी करून गेल्यावर्षी राज्यात युतीचं सरकार स्थापन केलं. यावेळी एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्री तर देवेंद्र फडणवीस यांनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली. या सर्वांसाठीच धक्का होता. याच पार्श्वभूमीवर देवेंद्र फडणवीस यांनी 'खुपते तिथे गुप्ते' या कार्यक्रमात एक गौप्यस्फोट केला आहे.
मुंबई, 24 जुलै 2023 | मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केलेल्या बंडानंतर महाराष्ट्राच्या राजकारणातलं समीकरण बदलून गेलं. एकनाथ शिंदे यांनी देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत हातमिळवणी करून गेल्यावर्षी राज्यात युतीचं सरकार स्थापन केलं. यावेळी एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्री तर देवेंद्र फडणवीस यांनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली. या सर्वांसाठीच धक्का होता. याच पार्श्वभूमीवर देवेंद्र फडणवीस यांनी ‘खुपते तिथे गुप्ते’ या कार्यक्रमात एक गौप्यस्फोट केला आहे. “एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्री केलं पाहिजे, हा विषय मी माझ्या पक्षाकडे मांडला होता. या नव्या सरकारमधून बाहेर राहण्याचा माझा विचार होता. तेव्हा माझ्या चेहऱ्यावर जराशीही नाराजी नव्हती, तर माझ्या चेहऱ्यावर विजयाचा आनंद होता. मात्र माझा हा आनंद फार काळ टिकला नाही, कारण घरी गेल्यानंतर मला आमच्या नेत्यांकडून सांगण्यात आलं की, तुला उपमुख्यमंत्री व्हावं लागेल. हा माझ्यासाठी धक्का होता,” असं फडणवीसांनी म्हटलं आहे.