'अजित पवारांना सोबत घेऊन विधानसभा...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस

‘अजित पवारांना सोबत घेऊन विधानसभा…,’ काय म्हणाले देवेंद्र फडणवीस

| Updated on: Aug 10, 2024 | 5:55 PM

अजितदादा आणि एकनाथ शिंदे यांना परिस्थितीची गरज म्हणून महायुतीत घेतले होते. एकट्याच्या बळावर निवडणूकीत बहुमत मिळणे कठीण असल्याचे अहवाल आले होते असे देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले आहे.

अजित पवार आणि एकनाथ शिंदे यांना परिस्थिती पाहून सोबत घेण्यात आल्याचा खुलासा राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी संघाच्या बैठकीत केले आहे. एकनाथ शिंदे यांना सोबत घेतल्याने बहुमत गाठता येणार नसल्याचे अहवालात म्हटले होते. त्यामुळे अजित पवार यांना सत्तेत घेण्याचा निर्णय घेण्यात आला. अजित पवार यांना सोबत घेऊन लढल्याने काही विशेष फायदा झालेला नाही असेही देवेंद्र फडणवीस यांनी या बैठकीत सांगितले. तसेच आता येत्या विधानसभा निवडणूका देखील अजित पवार यांच्या सोबत लढण्याचा निर्णय घेतल्याने देखील देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले आहे. अजित पवार आणि एकनाथ शिंदे यांना भाजपाने परिस्थितीची गरज म्हणून महायुतीत घेतले होते. एकट्याच्या बळावर निवडणूकीत बहुमत मिळणे कठीण असल्याचे अहवाल आल्याने  असा निर्णय घेण्यात आला होता असा खुलासा  देवेंद्र फडणवीस यांनी केला आहे.

 

Published on: Aug 10, 2024 05:54 PM