औरंगजेब भारतीय मुस्लिमांचा हिरो होऊ शकत नाही, विधान परिषदेत देवेंद्र फडणवीस कडाडले

“औरंगजेब भारतीय मुस्लिमांचा हिरो होऊ शकत नाही”, विधान परिषदेत देवेंद्र फडणवीस कडाडले

| Updated on: Aug 04, 2023 | 1:46 PM

काही दिवसांपूर्वी राज्यात औरंजेबाच्या मुद्द्यावर दंगली घडल्या होत्या. यामुळे राज्यातील कायदा आणि सुव्यवस्थेवर प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात आले होते. अशात आज पावसाळी अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या प्रकरणावर भाष्य केलं आहे.

मुंबई, 4 ऑगस्ट 2023 | काही दिवसांपूर्वी राज्यात औरंजेबाच्या मुद्द्यावर दंगली घडल्या होत्या. यामुळे राज्यातील कायदा आणि सुव्यवस्थेवर प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात आले होते. अशात आज पावसाळी अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या प्रकरणावर भाष्य केलं आहे. ते म्हणाले की, औरंगजेबाच्या मिरवणुकी, स्टेट्स ठेवले गेले. एकाच वेळी अनेक जिल्ह्यात हा प्रकार झाला. हा काही योगायोग नाही. हा प्रयोग आहे. आजपर्यंत भारतीय मुसलमानांचा हिरो कधी औरंजेब नव्हता. या देशाचे हिरो छत्रपती शिवाजी महाराज आणि संभाजी महाराजच होऊ शकतात. एपीजे अब्दुल कलाम होऊ शकतात. पण औरंगजेब होऊ शकत नाही.

 

Published on: Aug 04, 2023 01:45 PM