कोण संजय राऊत? देवेंद्र फडणवीस यांचा पत्रकारांना प्रतिप्रश्न; नेमकं काय घडलं पाहा व्हिडीओ...

“कोण संजय राऊत?” देवेंद्र फडणवीस यांचा पत्रकारांना प्रतिप्रश्न; नेमकं काय घडलं पाहा व्हिडीओ…

| Updated on: Jun 22, 2023 | 2:37 PM

झाकीर नाईक विखे पाटलांच्या संस्थेत साडे चार कोटी रुपये का देतो याची चौकशी करावी म्हणून गृहमंत्र्यांनी ईडीला पत्र लिहावं, असं संजय राऊत म्हणाले.यावर देवेंद्र फडणवीस यांना प्रश्न विचारला असता कोण संजय राऊत? असा प्रतिप्रश्न फडणवीस यांनी केला.

कराड : ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी शिंदे-फडणवीस सरकारमधील नेत्यांच्या घोटाळ्यांची यादी जाहीर करत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर निशाणा साधला आहे. मंत्री राधाकृष्ण विखे पाटील, अब्दुल सत्तार, दादा भुसे आणि आमदार राहुल कुल यांच्यावरही संजय राऊत यांनी गंभीर आरोप केलेत. झाकीर नाईक विखे पाटलांच्या संस्थेत साडे चार कोटी रुपये का देतो याची चौकशी करावी म्हणून गृहमंत्र्यांनी ईडीला पत्र लिहावं, असं संजय राऊत म्हणाले.यावर देवेंद्र फडणवीस यांना प्रश्न विचारला असता कोण संजय राऊत? असा प्रतिप्रश्न फडणवीस यांनी केला. उदयनराजे यांनी शिवेंद्र राजेंचा कार्यक्रम उधळून लावला होता. त्यानंतर आज देवेंद्र फडणवीस यांनी दोघांसोबत बैठक केली. सातारा जिल्हा तसेच मसवड MIDC संदर्भात काही महत्वाचे निर्णय झाले.

Published on: Jun 22, 2023 02:37 PM