प्रकाश आंबेडकर यांच्याकडून राजकराणाची दिशा भरकटवण्याचं काम,देवेंद्र फडणवीस यांची टीका

“प्रकाश आंबेडकर यांच्याकडून राजकराणाची दिशा भरकटवण्याचं काम”,देवेंद्र फडणवीस यांची टीका

| Updated on: Jun 06, 2023 | 6:30 PM

भीमा-कोरेगाव प्रकरणी तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची साक्ष तपासण्याची परवानगी द्या, अशी मागणी करणारे पत्र प्रकाश आंबेडकर यांनी लिहीले होते. त्या पार्श्वभूमीवर बोलताना फडणवीस यांनी ही प्रतिक्रिया दिली आहे.

मुंबई : भीमा-कोरेगाव प्रकरणी तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची साक्ष तपासण्याची परवानगी द्या, अशी मागणी करणारे पत्र प्रकाश आंबेडकर यांनी लिहीले होते. त्या पार्श्वभूमीवर बोलताना फडणवीस यांनी ही प्रतिक्रिया दिली आहे. प्रकाश आंबेडकर हे राजकारणाची दिशा भरकटवण्याचा प्रयत्न करत आहेत, अशी टीका उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे. लक्ष दुसरीकडे वेधण्यासाठी आंबेडकर अशी वक्तव्य करत असल्याचे ते म्हणाले.मुंबईतील लहान बालकांसांठी किलबिलाट ॲम्ब्युलन्सचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत उद्घाटन करण्यात आले. तेव्हा ते माध्यमांशी बोलत होते.