ज्यांचा गृहमंत्री जेलमध्ये गेला ते आम्हाला कायदा सुव्यवस्था शिकवत आहेत, देवेंद्र फडणवीस यांचा टोला

महाराष्ट्रात लाडकी बहीण योजनला प्रचंड प्रतिसाद मिळाला आहे. सर्व लाडक्या बहीणी सरकारच्या पाठिशी आहेत. ही योजना गेम चेंजर झाली आहे. परंतु विरोधक ही योजना बंद करण्यासाठी कोर्टात गेले आहेत. महाविकास आघाडी आमच्या सर्व योजना बंद करण्याची भाषा करीत आहे. परंतु लाडकी बहीण योजनेचा हात लावला तर याद राखा…

ज्यांचा गृहमंत्री जेलमध्ये गेला ते आम्हाला कायदा सुव्यवस्था शिकवत आहेत, देवेंद्र फडणवीस यांचा टोला
| Updated on: Oct 16, 2024 | 1:51 PM

काल महाराष्ट्राच्या विधानसभा निवडणूकांची घोषणा झाली आहे. आज महायुतीने पत्रकार परिषदेत घेत महाविकास आघाडीवर चौफेर टीका केली आहे.यावेळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की या सरकारने लाडकी योजनेसाठी पैसा कुठून आणणार अशी टीका केली नंतर आमचे सरकार आल्यावर पाच हजार रुपये बहि‍णींना देऊ असेही यांचे नेते म्हणत आहेत. त्यामुळे यांना नक्की एक स्टॅंड घ्यावा. जर पैसे नाही म्हणता मग यांचे सरकार लाडक्या बहि‍णींना पाच हजार कुठून देणार आहेत अशीही विचारणा फडणवीस यांनी केली. या सरकारचे लोक लाडकी बहीण योजना बंद करण्यासाठी कोर्टात गेले होते. कोर्टाने ते ऐकले नाही ही गोष्ट सोडून द्या. यांचे नेते उद्धव ठाकरे यांनी आमची सत्ता येतात अडीच वर्षांतील निर्णय रद्द करणार असे म्हटले आहे. महाराष्ट्राला कुलुप बंद करण्याची यांची योजना आहे ती आम्ही यशस्वी होऊ देणार नाही. कायदा – सुव्यवस्था म्हणायचे तर आमच्याकडे आकडेवारी आहे. परंतू त्यात आम्ही जात नाही. आम्ही अशा घटनांवर तातडीने कारवाई केली आहे. परंतू यांचे गृहमंत्री जेलमध्ये गेले होते. कोरोनाकाळात पत्रकारांना यांनी पकडले. पैसे घेऊन अधिकाऱ्यांच्या बदली प्रकरणात यांच्याविरोधात सीबीआय चौकशी सुरु आहेत ते लोक कायदा – सुव्यवस्थेवर बोलत आहेत अशी टीका देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे.

Follow us
भारत आणि कॅनडा संबंध आणखी बिघडले,बिष्णोई टोळीशी काय कनेक्शन ?
भारत आणि कॅनडा संबंध आणखी बिघडले,बिष्णोई टोळीशी काय कनेक्शन ?.
दिल्लीत महायुतीच्या जागांचा फॉर्म्युला ठरणार,अमित शाहसोबत अंतिम बैठक
दिल्लीत महायुतीच्या जागांचा फॉर्म्युला ठरणार,अमित शाहसोबत अंतिम बैठक.
आमचं सरकार आलं तर बहि‍णींना तीन हजार रुपये देणार - गुलाबराव पाटील
आमचं सरकार आलं तर बहि‍णींना तीन हजार रुपये देणार - गुलाबराव पाटील.
'लाडकी बहीण योजना' बंद करणाऱ्यांचा करेक्ट कायक्रम - मुख्यमंत्री
'लाडकी बहीण योजना' बंद करणाऱ्यांचा करेक्ट कायक्रम - मुख्यमंत्री.
ज्यांचा गृहमंत्री जेलमध्ये गेला ते आम्हाला कायदा...काय म्हणाले फडणवीस
ज्यांचा गृहमंत्री जेलमध्ये गेला ते आम्हाला कायदा...काय म्हणाले फडणवीस.
लाडकी बहिण कोणाची ?महायुतीत श्रेयवाद सुरुच, तीन पक्षात स्पर्धा
लाडकी बहिण कोणाची ?महायुतीत श्रेयवाद सुरुच, तीन पक्षात स्पर्धा.
लाडकी बहीण योजनेच्या यशामुळे विरोधक गडबडले - अजित पवार
लाडकी बहीण योजनेच्या यशामुळे विरोधक गडबडले - अजित पवार.
टोल माफ करण्याची मागणी आमचीच - राज ठाकरे
टोल माफ करण्याची मागणी आमचीच - राज ठाकरे.
बाबा सिद्दीकींच्या हत्येनंतर सलमानच्या सुरक्षेत वाढ
बाबा सिद्दीकींच्या हत्येनंतर सलमानच्या सुरक्षेत वाढ.
अमित शाह, भाजपचा कोणताही त्याग नाही - संजय राऊत
अमित शाह, भाजपचा कोणताही त्याग नाही - संजय राऊत.