वाजपेयींची कविता, देवेंद्र फडणवीस यांचा फोटो; शिवसेनेच्या जाहिरातीनंतर मुंबईत भाजपची बॅनरबाजी
गेल्या दोन दिवसांपूर्वी सर्व वृत्तपत्रांमध्ये एक जाहिरात प्रसिद्ध झालेली होती. त्या जाहिरातीमध्ये 'राष्ट्रामध्ये मोदी, राज्यात शिंदे' असा मजकूर छापण्यात आला होता. या जाहिरातीवरतून भाजप आणि शिवसेनेमध्ये चांगलीच जुंपलेली पाहायला मिळाली.
मुंबई : गेल्या दोन दिवसांपूर्वी सर्व वृत्तपत्रांमध्ये एक जाहिरात प्रसिद्ध झालेली होती. त्या जाहिरातीमध्ये ‘राष्ट्रामध्ये मोदी, राज्यात शिंदे’ असा मजकूर छापण्यात आला होता. या जाहिरातीवरतून भाजप आणि शिवसेनेमध्ये चांगलीच जुंपलेली पाहायला मिळाली. भाजपच्या काही नेत्यांनी यावर नाराजीही व्यक्त केली होती. या सगळ्या प्रकरणानंतर आता उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या समर्थकांकडून या जाहिरातीला उत्तर म्हणून ठीक ठिकाणी बॅनरबाजी करण्यात आली आहे. मुंबईमधील नरिमन पॉईंट येथील भाजपच्या प्रदेश कार्यालयाच्या बाहेर मुंबई भाजपचे उपाध्यक्ष आचार्य पवन त्रिपाठी यांनी देवेंद्र फडणवीस यांच्या समर्थनार्थ बॅनरबाजी केली आहे. या बॅनरवर पूर्व पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांची कविता लिहिण्यात आलेली आहे.
Published on: Jun 15, 2023 04:04 PM
Latest Videos