विरोधी पक्षनेते पदावरून देवेंद्र फडणवीस यांची विजय वडेट्टीवार यांना कोपरखळी; म्हणाले, होऊ घातलेले विरोधी पक्षनेते...

विरोधी पक्षनेते पदावरून देवेंद्र फडणवीस यांची विजय वडेट्टीवार यांना कोपरखळी; म्हणाले, “होऊ घातलेले विरोधी पक्षनेते…”

| Updated on: Aug 03, 2023 | 2:01 PM

राज्याच्या विधिमंडळ अधिवेशनाचा शेवटा आठवडा सुरु आहे. त्यामुळे सत्ताधारी आणि विरोधक एकमेकांवर टीका-टिप्पणी करताना दिसत आहेत. या शेवटच्या आवठड्याच्या चौथ्या दिवशी विधानसभेत एक प्रसंग घडताच सभागृहात एकच हशा पिकला.

मुंबई, 03 ऑगस्ट 2023 | राज्याच्या विधिमंडळ अधिवेशनाचा शेवटा आठवडा सुरु आहे. त्यामुळे सत्ताधारी आणि विरोधक एकमेकांवर टीका-टिप्पणी करताना दिसत आहेत. या शेवटच्या आवठड्याच्या चौथ्या दिवशी विधानसभेत एक प्रसंग घडताच सभागृहात एकच हशा पिकला. विधानसभेत प्रश्नोत्तराच्या तासादरम्यान काँग्रेस आमदार विजय वडेट्टीवार यांनी राज्यातील बंधारे फुटल्याचा प्रश्न मांडला. विजय वडेट्टीवार यांनी मांडलेल्या प्रश्नाच्या उत्तराच्या सुरुवातीलाच देवेंद्र फडणवीसांनी समोर बसलेल्या विजय वडेट्टीवारांना कोपरखळी मारली. त्यामुळए सभागृहात एकच हशा पिकला. देवेद्र फडणवीसांच्या बाजूलाच बसलेल उपमुख्यमंत्री अजित पवारही यावर हसू लागले.नेमकं काय घडलं यासाठी पाहा हा व्हिडीओ…

Published on: Aug 03, 2023 01:15 PM