देवेंद्र फडणवीस यांचा खरमरीत टोला, आमच्यातील साहित्य सकाळी ओसंडून वाहते
आम्ही राजकारणी अनेक साहित्यिकांची प्रेरणा आहोत. आम्ही नसलो तर व्यगंचित्र काढणाऱ्यांना फार काही काम उरणार नाही. आमच्यातही साहित्यिक फार आहेत. काही शीघ्रकवी आहेत.
वर्धा : विचारांची अभिव्यक्ती करण्यासाठी माध्यमे खूप वाढली आहेत. सोशल मीडियामुळे नवं साहित्य तयार झाले आहे. पण, नवं माध्यमाचा संक्रमण काळ सुरु आहे. त्याला खोली नाही, उंची नाही. काही काळात तसे साहित्य तयार होईल. पण, पुस्तकामधून जी काही साहित्य पेरणी होते ती दीर्घकाळ कायम राहते. दर्जेदार पुस्तक वाचणे, त्यातून ज्ञान घेणे हे आपले काम आहे. मराठीला वेगळ्या उंचीवर पोहोचवणारे अनेक साहित्यक आहेत. त्यामुळे मराठी भाषा आपला दर्जा टिकवून आहे. साहित्याच्या व्यासपीठावर आम्ही इतके राजकारणी काय करतो असा प्रश्न नेहमी विचारला जातो. पण, माझे उत्तर वेगळे आहे. आम्ही राजकारणी अनेक साहित्यिकांची प्रेरणा आहोत. आम्ही नसलो तर व्यगंचित्र काढणाऱ्यांना फार काही काम उरणार नाही. आमच्यातही साहित्यिक फार आहेत. काही शीघ्रकवी आहेत. काही यमक जुळविणारे आहेत. काही स्टोर्या लिहिणारे लेख आहेत, काही स्क्रिप्ट लिहिणारे आहेत. सकाळीच टीव्ही लावला की आमच्यातील साहित्य ओसंडून वाहते, असा खरमरीत टोला उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी संजय राऊत यांना लगावला आहे. वर्ष येथे साहित्य संमेलनाच्या व्यासपीठावरून ते बोलत होते.