Who is Maharashtra new CM : देवेंद्र फडणवीस आज सत्तास्थापनेचा दावा करणार, 3 वाजता राज्यपालांची भेट घेणार, सूत्रांची माहिती

Who is Maharashtra new CM : देवेंद्र फडणवीस आज सत्तास्थापनेचा दावा करणार, 3 वाजता राज्यपालांची भेट घेणार, सूत्रांची माहिती

| Updated on: Jun 30, 2022 | 12:49 PM

आज तीन वाजता भाजप सत्तास्थापनेचा दावा करणार आहेत. भाजप नेते देवेंद्र फडणवीस सत्तास्थापनेचा दावा आज राज्यपालांकडे करणार असल्याची माहिती कालच सूत्रांनी दिली होती. तर 1 जुलैला देवेंद्र फडणवीस-एकनाथ शिंदे सरकारचा शपथविधी होणार असल्याचं सूत्र सांगतात.

मुंबई : उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी मुख्यमंत्रीपदाचा (CM) राजीनामा दिल्यानंतर राज्यातील घडामोडींना वेग आलाय. आज तीन वाजता भाजप सत्तास्थापनेचा दावा करणार आहेत. भाजप (BJP) नेते देवेंद्र फडणवीस सत्तास्थापनेचा दावा आज राज्यपालांकडे करणार असल्याची माहिती कालच सूत्रांनी दिली होती. तर 1 जुलैला देवेंद्र फडणवीस-एकनाथ शिंदे सरकारचा शपथविधी होणार असल्याचं सूत्र सांगतात. शिवसेनेतून बंडखोरी केल्यानंतर महाविकास आघाडी सरकार अल्पमतात आलं होतं. यानंतर वेळोवेळी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी बंडखोरांना मुंबईत बोलावण्याचा अनेकदा प्रयत्न केला. मात्र, दुसरीकडे शिवसेना नेते संजय राऊत आणि आदित्य ठाकरे यांच्या टीका टिप्पणी आणि आरोपांमुळे बंडखोरांनी वेगळी वाट पकडली. आता 1 जुलैला भाजपचे नेते देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत एकनाथ शिंदे गट सरकार स्थापन करणार असून सत्तेचा फॉर्म्यूला देखील तयार झाल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. हाच सत्तेचा फॉर्म्यूला टीव्ही9च्या हाती लागलाय.

Published on: Jun 30, 2022 12:49 PM