VIDEO | अबब..! विठुरायाच्या चरणी कोट्यावधींचं दान; खजिन्यात खणखणच खणखण
यंदा अधिक मास आल्याने श्रावणाना अधिक महत्व आलं आहे. अधिक मासामुळे अनेक भक्तांची पावले मंदिरांकडे वळाली आहेत. तर यंदा अधिक मासामुळे अनेक मंदिरात खणखण वाढली आहे.
पंढरपूर : 19 ऑगस्ट 2023 | श्रावणानाला अधिक मास जोडून आल्याने यंदा श्रावणानाच्या आधीच अनेक भक्तांनी विठुरायाच्या दर्शनासाठी पंढरपूर गाठले. तर भक्तांनी भरभरून मंदिराला दान केलं आहे. अधिक मासात श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिरात भक्तांनी तब्बल 7 कोटी 19 लाख 43 हजार 37 रुपये इतके दान केले आहे. विशेष म्हणजे 2018 साली पेक्षा यंदा अधिक उत्पन्न मिळाले आहे. हे तब्बल 4 कोटी 86 लाख 91 हजार 113 रुपये उत्पन्न मिळाल्याची माहिती श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीचे कार्यकारी अधिकारी राजेंद्र शेळके यांनी दिली. तर यंदा अधिक महिन्यात 6 लाख 39 हजार 917 भाविकांनी श्री विठ्ठल रुक्मिणीचे दर्शन घेतलं आहे.
Published on: Aug 19, 2023 09:46 AM
Latest Videos