संजय राऊत हेच शिवसेना फुटीचं कारण, कुणी केली टीका?

“संजय राऊत हेच शिवसेना फुटीचं कारण”, कुणी केली टीका?

| Updated on: Aug 03, 2023 | 2:50 PM

शिवसेना खासदार धैर्यशील माने यांनी संजय राऊत यांच्यावर टीका केली आहे. शिवसेना फुटीचं कारण हे संजय राऊत यांचं बोलणं आहे. ते जिथं जातात तिथं दुफळी निर्माण करतात, असं धैर्यशील माने म्हणाले.

नवी दिल्ली: शिवसेना खासदार धैर्यशील माने यांनी संजय राऊत यांच्यावर टीका केली आहे. शिवसेना फुटीचं कारण हे संजय राऊत यांचं बोलणं आहे. ते जिथं जातात तिथं दुफळी निर्माण करतात, असं धैर्यशील माने म्हणाले. संजय राऊत यांनी गजानन कीर्तीकर यांच्यावर केलेल्या वक्तव्यावर धैर्यशील माने यांनी प्रतिक्रिया दिली आहे. “निवडणुकांना अजून बराच कालावधी आहे, आम्ही चर्चा करून निर्णय घेऊ.संजय राऊतांना सातत्याने दृष्टांत होत असतो. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी बाळासाहेब ठाकरे यांनी केलेली युती पुढे नेली आहे. म्हणून राऊत यांनी त्यांनी आमची चिंता करण्यापेक्षा त्यांच्याबरोबर ते गेलेत त्यांची चिंता करावी”.

Published on: May 27, 2023 03:01 PM