धनंजय मुंडेंची प्रकृती चांगली, डॉक्टरांचा विश्रांतीचा सल्ला;  अजित पवारांची माहिती

धनंजय मुंडेंची प्रकृती चांगली, डॉक्टरांचा विश्रांतीचा सल्ला; अजित पवारांची माहिती

| Updated on: Apr 13, 2022 | 12:34 PM

सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांची प्रकृती चांगली असून, तज्ज्ञ डॉक्टरांच्या देखरेखीखाली ते उपचार घेत आहेत. सतत प्रवास, दगदग यातून त्यांना भोवळ येऊन शुद्ध हरपली व त्यानंतर तातडीने त्यांना ब्रीच कँडीमध्ये दाखल करण्यात आले.

सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांची प्रकृती चांगली असून, तज्ज्ञ डॉक्टरांच्या देखरेखीखाली ते उपचार घेत आहेत. सतत प्रवास, दगदग यातून त्यांना भोवळ येऊन शुद्ध हरपली व त्यानंतर तातडीने त्यांना ब्रीच कँडीमध्ये दाखल करण्यात आले. त्यांना हृदयविकाराचा झटका आता हे वृत्त चुकीचे आहे, डॉक्टरांनी आणखी काही चाचण्या सांगितल्या असून, मुंडे यांना सक्तीची विश्रांती घेण्याचा सल्ला दिला असल्याची माहिती उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिली आहे. आज सकाळी उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी ब्रीच कँडी रुग्णालयात जाऊन धनंजय मुंडे यांची भेट घेतली, यावेळी त्यांनी मुंडे यांची विचारपूस करत डॉक्टरांकडून माहिती घेतली. डॉक्टरांनी त्यांना सक्तीच्या विश्रांतीचा सल्ला दिल्याचे यावेळी अजित पवार यांनी म्हटले. अजित पवार यांनी मुंडेंना लवकर बरे होण्यासाठी शुभेच्छा देखील दिल्या आहेत.

Published on: Apr 13, 2022 12:34 PM