बहिणीसाठी भाऊ पुढं सरसावला, पंकजा मुंडे यांच्यासाठी धनंजय मुंडे यांनी काय केलं?

| Updated on: Sep 27, 2023 | 4:23 PM

VIDEO | भाजप नेत्या पंकजा मुंडे यांच्या वैद्यनाथ सहकारी साखर कारखान्याला केंद्रीय जीएसटी आयुक्तालयाकडून नोटीस मिळाल्यानंतर भाऊ धनंजय मुंडे यांनी कसली कंबर, पंकजा मुंडे वैद्यनाथ सहकारी साखर कारखाना वाचवण्यासाठी मंत्री धनंजय मुंडे मार्गदर्शन करणार असल्याची सुत्रांची माहिती

बीड, २७ सप्टेंबर २०२३ | भाजप नेत्या पंकजा मुंडे यांच्या वैद्यनाथ सहकारी साखर कारखान्याला केंद्रीय जीएसटी आयुक्तालयाकडून नोटीस मिळाल्यानंतर भाऊ आणि मंत्री धनंजय मुंडे यांनी कसली कंबर कसल्याचे पाहायला मिळत आहे. पंकजा मुंडे यांचा कारखाना वाचवण्यासाठी भावाने कंबर कसली आहे. पंकजा मुंडे वैद्यनाथ सहकारी साखर कारखाना वाचवण्यासाठी मंत्री धनंजय मुंडे मार्गदर्शन करणार असल्याचे सांगितले जात आहे. तर कारखान्याकडून सरकारला प्रस्ताव पाठवण्याबाबत सांगण्यात येणार आहे. यासंबंधित विषयावर धनंजय मुंडे स्वत: पंकजा मुंडे यांच्याशी चर्चा करणार आहेत. वैद्यनाथ सहकारी साखर कारखाना वाचवण्यासाठी धनंजय मुंडे यांच्याकडून प्रयत्न केले जात असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. दरम्यान, या कारखान्याच्या नोटीसवरून पंकजा मुंडे यांनी जाहीरपणे नाराजी व्यक्त केली होती. माझा कारखाना सोडून इतर सर्व कारखान्यांना आर्थिक अडचणी असलेल्या कारखान्यांना केंद्राकडून मदत करण्यात आली मग माझाच प्रस्ताव का वगळला असा सावाल पंकजा मुंडे यांनी काल उपस्थित केल्याचे पाहायला मिळाले होते.

Published on: Sep 27, 2023 04:23 PM
Ganesh Chaturthi 2023 : आधी लगीन कोंढाण्याचं… बाप्पासाठी साकारला तानाजी मालुसरे यांचा ऐतिहासिक देखावा
MPSC परीक्षा पास पण हाकतोय मेंढ्या, पण का? सोशल मीडियावर होतोय व्हिडीओ व्हायरल