परळीत धनंजय मुंडे भावुक; म्हणाले , “या जागेवर अख्ख मंत्रिमंडळ…”
राष्ट्रवादीमध्ये बंड केल्यानंतर आणि मंत्री झाल्यानंतर पहिल्यांदाच धनंजय मुंडे काल परळीत दाखल झाले. यावेळी परळीकरांनी धनंजय मुंडे यांचं जंगी स्वागत केलं. यावेळी धनंजय मुंडे यांनी परळीकरांशी संवाद साधला.
बीड : राष्ट्रवादीमध्ये बंड केल्यानंतर आणि मंत्री झाल्यानंतर पहिल्यांदाच धनंजय मुंडे काल परळीत दाखल झाले. यावेळी परळीकरांनी धनंजय मुंडे यांचं जंगी स्वागत केलं. यावेळी धनंजय मुंडे यांनी परळीकरांशी संवाद साधला. महाराष्ट्राच्या राजकारणात काय झालं, काय नाही झालं हे आपण पाहिलं असेल. याचे तुम्हाला काही सोयरसुतक वाटतेय का? नाही. आगामी काळात आपल्याला राज्यात आणि देशात अधिक सन्मान मिळेल. सत्ता येते आणि जाते. पण सत्ता येताना आणि जाताना काय फरक असतो ते मी पाहिले आहे. मी पहिल्यांदा विधान मंडळात गेलो ते केवळ अजितदादांमुळे. मंत्री झालोय, त्यामुळं तुमच्या अपेक्षा वाढल्यात. कार्यकर्त्याच्या अपेक्षा पूर्ण करणे फार अवघड नाही. संपूर्ण मंत्रिमंडळाला परत इथे आणायचे आहे, असं धनंजय मुंडे म्हणाले. धनंजय मुंडे यांनी यावेळी शेरोशायरी देखील केली. “समयने कुछ वक्त मेरा साथ ना दिया, मेरी काबिलीयत पर लोग शक करने लगे,” असं धनंजय मुंडे म्हणाले.