भरसभेत धनंजय मुंडे यांची टोलेबाजी, अनेक बाजूने घेरले पण त्यांना…
२०१९ ला निकाल लागला विजय साजरा केला. मंत्री होईल की नाही माहित. पण मंत्री झालो. पहिलेच अधिवेशन होते आणि लॉकडाऊन जाहीर झाला. पण मतदार संघातील एकाही कुटुंबाला रेशन कमी पडणार नाही याची काळजी घेतली.
परळी : २०१९ ला निकाल लागला विजय साजरा केला. मंत्री होईल की नाही माहित. पण मंत्री झालो. पहिलेच अधिवेशन होते आणि लॉकडाऊन जाहीर झाला. पण मतदार संघातील एकाही कुटुंबाला रेशन कमी पडणार नाही याची काळजी घेतली. या जिल्ह्यातील माणूस कुठेही अडकला असेल. जम्मू असो, तामिळनाडू असो. ओरिसा असो, जिथे जिथे आपला माणूस अडकला होता. त्याला मदत पोहचवली. पुण्याला शिकलो त्याचा फायदा इथे झाला. अनेक मित्रांना फोन करून मदत कार्याला लावले. आमदार, मंत्री झाल्यानंतर कर्तव्य पार पाडणे ही माझी जबाबदारी आहे. पण, एखाद्याच्या आयुष्यात किती वाईट वेळ यावी, किती वेळ यावी याचे काही बंधन नाही. पण, पहिल्या कोविड काळात २००० माणसे जर एका बैलाला घाबरत असतील. त्यांच्यात काही होत असेल तर तुम्हाला चांगले म्हणावे, कातडीवर म्हणावे की पळवाट आहेत ? त्यांना काय म्हणावं, असा टोला राष्ट्रवादीचे आमदार आणि माजी मंत्री धनंजय मुंडे यांनी विरोधकांना लगावला.