बोगस बियाण्यांच्या मुद्यावरुन सभागृहात गदारोळ, कृषीमंत्री धनंजय मुंडे यांचं विरोधकांना सडेतोड उत्तर!
राज्याच्या पावसाळी अधिवेशनाच्या तिसऱ्या दिवशी शेतकऱ्यांच्या मुद्द्यावरून विरोधक आणि सत्ताधारी आमने-सामने आल्याचे दिसले. विरोधकांनी आक्रमक भूमिका घेत बोगस बियाण्यांच्या मुद्द्यावर सरकारला धारेवर धरलं, तर यावर कृषी मंत्री धनंजय मुंडे यांनी उत्तर दिलं आहे.
मुंबई | 19 जुलै 2023 : राज्याच्या पावसाळी अधिवेशनाच्या तिसऱ्या दिवशी शेतकऱ्यांच्या मुद्द्यावरून विरोधक आणि सत्ताधारी आमने-सामने आल्याचे दिसले. विरोधकांनी आक्रमक भूमिका घेत बोगस बियाण्यांच्या मुद्द्यावर सरकारला धारेवर धरलं, तर यावर कृषी मंत्री धनंजय मुंडे यांनी उत्तर दिलं आहे. ते म्हणाले की, “खतांचे भाव वाढलेले नाहीत. ते स्थिर आहेत. केंद्र सरकारने खतांच्या किंमती वाढवलेल्या नाहीत. बोगस बियाणे विकून शेतकऱ्यांची फसवणूक होते हे मी मान्य करतो. बोगस बियाणांच्या संदर्भात यापूर्वी 1966 चा बीटी कॉटनचा कायदा आहे. तरीही हे प्रकार थांबत नसल्यामुळे आपण आता त्यासाठी आणखी कडक कायदे आणत आहोत. 1966 च्या कायद्यात असा गुन्हा केला तर 500 रुपयांचा दंड आहे. दुसऱ्यांदा गुन्हा केला तर एक हजार रुपयांचा दंड आणि त्यानंतरही गुन्हा केला तर परवाना रद्द अशी तुटपुंजी तरतुद आहे. त्यामुळे हा कायदा आणखी कडक करण्यासाठी सरकारने समिती गठीत केली आहे. बीटी कॉटनप्रमाणे बोगस बियाणे विक्रीप्रकरणी कारवाई केली जाईल. आम्ही सत्तेत सहभागी झाल्यानंतर पहिल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत हा निर्णय घेतला आहे.”