Dhananjay Munde : ‘पंकजाताई आणि मी…’; ‘शासन आपल्या दारी’ कार्यक्रमामध्ये धनंजय मुंडे यांचं मोठं वक्तव्य
अनेक कार्यक्रम केले. पण शासन आपल्या दारी निमित्ताने पहिल्यांदा असा कार्यक्रम होत आहे. व्यासपीठावरील सर्वांना बोलावं असं वाटेल असा हा कार्यक्रम आहे. एवढी गर्दी पाहिल्यावर तोंडातून शब्द फुटू नये इतकी गर्दी आहे. माझीच नजर न लागो माझ्या वैभवाला, असे म्हणत सभेची सुरूवात केली.
बीड, ५ डिसेंबर २०२३ : बीडमधील शासन आपल्या दारी या कार्यक्रमाच्या निमित्ताने पंकजा मुंडे आणि धनंजय मुंडे एकाच मंचावर आल्याचे पाहायला मिळाले. यावेळी धनंजय मुंडे यांनीही जोरदार भाषण केलं. यावेळी त्यांनीही पंकजा यांचं तोंडभरून कौतुक केलं तर पंकजाताई आणि मी दोघं मिळून बीडचा विकास करू असे म्हणाले. तर जीवनात अनेक सभा केल्या. अनेक कार्यक्रम केले. पण शासन आपल्या दारी निमित्ताने पहिल्यांदा असा कार्यक्रम होत आहे. व्यासपीठावरील सर्वांना बोलावं असं वाटेल असा हा कार्यक्रम आहे. एवढी गर्दी पाहिल्यावर तोंडातून शब्द फुटू नये इतकी गर्दी आहे. माझीच नजर न लागो माझ्या वैभवाला, असे म्हणत सभेची सुरूवात केली. बीड जिल्ह्यातील 36 हजार लाभार्थ्यांना प्रत्यक्ष लाभ दिला. या तिघांमुळे 1400 कोटीचा निधी आला. यापूर्वी एवढा निधी कधी आला नाही. एवढा निधी दिला त्यासाठी आभार मानतो. बीडच्या मागे ताकदीने उभे राहिला आहात. विकासाची गंगा तुम्ही देत आहात. थोडेसा आणखी हात ढिला करा. हा बीड जिल्हा मागास जिल्हा म्हणून ओळखला म्हणून ओळखला जाणार नाही. ऊस तोड कामगारांचा जिल्हा म्हणून ओळखला जाणार नाही, एवढा आम्ही विकास करू, अशी ग्वाही धनंजय मुंडे यांनी दिली.