Dhananjay Munde Car Accident | धनंजय मुंडे यांच्या गाडीचा परळीत अपघात
मुंडे यांनी लातूर येथून मुंबईला एअर अॅब्म्युलन्समधून हलविण्यात येणार आहे. काल परळीतील आझाद चौकात रात्रीच्या वेळी ही घटना घडली.
परळी : बीड जिल्ह्यातील राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार आणि माजी मंत्री धनंजय मुंडे यांच्या गाडीचा अपघात झाल्याची माहिती काल त्यांनीच ट्वीटरव्दारे दिली होती. त्यानंतर आता त्यांना पुढील उपचारासाठी मुंबईला हलविण्यात येणार आहे.
या अपघातात धनंजय मुंडे यांच्या छातीला मार लागल्याचे सांगण्यात येत होतं. त्यानंतर त्यांची प्रकृती ठीक असल्याचे सांगितले जात आहे. तरीही त्यांना मुंबईत पुढील उपचारासाठी पाठवण्यात येणार असल्याची माहिती डॉक्टरांनी दिली आहे.
तर मुंडे यांनी लातूर येथून मुंबईला एअर अॅब्म्युलन्समधून हलविण्यात येणार आहे. काल परळीतील आझाद चौकात रात्रीच्या वेळी ही घटना घडली. रात्री सुमारे पावणे तीन वाजेच्या सुमारास धनंजय मुंडे यांच्या कारला अपघात झाला. यावेळी धनंजय मुंडे स्वतः गाडी चालवत होते.
Published on: Jan 04, 2023 05:35 PM
Latest Videos