Dhananjay Munde यांचा पंकजाताईंच्या डोक्यावर मायेचा हात-tv9
बीडमधील कट्टर राजकीय शत्रू असलेले धनंजय मुंडे आणि पंकजा मुंडे कोणत्याही कार्यक्रमात एकमेकांवर टीका-टिप्पणी करण्याची संधी सोडत नाहीत. त्यातच व्यासपीठावर एकत्र असताना त्यांनी थेट केलेल्या टीका अनेकदा मनोरंजन करणाऱ्या ठरतात. या क्रार्यक्रमात भावा बहिणी मधील प्रेमळ नातं ही टोमण्यासोबत दिसलं आहे.
मुंबईःडॉ. तात्याराव लहाने (Tatyarao Lahane) यांच्या रघुनाथ नेत्रालयाचं उद्घाटन शरद पवारांच्या हस्ते पार पडलं. यावेळी धनंजय मुंडे (Dhananjay Munde) आणि पंकजा मुंडे (Pankaja Munde) यांनी एकमेकांवर सोडलेले शाब्दिक तीर मुंबईपासून बीडच्या (Beed) गल्ल्यांपर्यंत चर्चेचा विषय ठरला आहे.या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून पर्यटनमंत्री आदित्य ठाकरे, अमित देशमुख, बाळासाहेब थोरात, धनंजय मुंडे, पंकजा मुंडे, प्रीतम मुंडे उपस्थित होते.बीडमधील कट्टर राजकीय शत्रू असलेले धनंजय मुंडे आणि पंकजा मुंडे कोणत्याही कार्यक्रमात एकमेकांवर टीका-टिप्पणी करण्याची संधी सोडत नाहीत. त्यातच व्यासपीठावर एकत्र असताना त्यांनी थेट केलेल्या टीका अनेकदा मनोरंजन करणाऱ्या ठरतात.या कार्यक्रमात धनंजय मुंडे यांनी पंकजा ताईंच्या डोक्यावर मायेने हात फिरवाला. आशा प्रसंगात भावा बहिणींच्या नात्यातील प्रेमळ संबंध सर्वासमोर अनेकदा येत असतात.मुंबईतल्या या कार्यक्रमातील त्यांचे हे परस्पर टोमणेही सध्या राजकीय वर्तुळात चांगलेच चर्चेत आहे. मुंबईपासून बीडच्या गल्ल्या-गल्ल्यांतही ते सोशल मीडियावर आवर्जून शेअर केले जात आहेत.