...म्हणून धनंजय मुंडेंनी स्वतःच फेटा बांधून घेतला; व्हिडिओ सोशल मिडीयावर व्हायरल

…म्हणून धनंजय मुंडेंनी स्वतःच फेटा बांधून घेतला; व्हिडिओ सोशल मिडीयावर व्हायरल

| Updated on: Jul 17, 2022 | 4:57 PM

धनंजय मुंडे यांच्या वाढदिवसानिमित्ताने कार्यकर्त्यांनी आपल्या नेत्यासाठी मोठ्या आवडीने फेटा आणला. मात्र, फेटा कोणालाच बांधता येत नसल्याने तारांबळ उडाली. मग काय वेळ न दवडता धनंजय मुंडेंनी स्वतःच फेटा बांधून घेतला.

राष्ट्रवादी नेते परळीचे आमदार धनंजय मुंडे(Dhananjaya Munde) सतत कोणत्या ना कोणत्या कारणाने सतत चर्चेत असतात. काही दिवसांपूर्वी धनंजय मुंडे यांचा फिटनेसचा व्हिडीओ तुफान व्हायरल झाला होता. आता मुंडेंनी स्वतः फेटा बांधून घेतलेला व्हिडीओ सोशल मिडीयावर व्हायरल होतोय. धनंजय मुंडे यांच्या वाढदिवसानिमित्ताने कार्यकर्त्यांनी आपल्या नेत्यासाठी मोठ्या आवडीने फेटा आणला. मात्र, फेटा कोणालाच बांधता येत नसल्याने तारांबळ उडाली. मग काय वेळ न दवडता धनंजय मुंडेंनी स्वतःच फेटा बांधून घेतला. अत्यंत उत्कृष्टपणे बांधून घेतलेल्या फेट्याचा व्हिडीओ सध्या चर्चेचा विषय बनला आहे.