मोरल सपोर्ट देण्यासाठीच हा खटाटोप; उद्धव ठाकरेंच्या टीकेला उदय सामंत यांचे प्रत्युत्तर
आपल्याकडचे उरलेले आमदार, पदाधिकारी, कार्यकर्ते इकडे तिकडे जाऊ नये यासाठी उद्धव ठाकरे खटाटोप करत असल्याची टीका देखील सावंत यांनी केली आहे
ठाणे : ‘माझं धनुष्यबाण’ चोरुन नेलं, तरी पण श्रीरामांचे आशीर्वाद माझ्यासोबत आहेत. आपल्याकडे ब्रह्मास्त्र आहे. असं म्हणत उद्धव ठाकरेंनी नाव न घेता एकनाथ शिंदे आणि भाजपवर टीका केली होती. त्यावर उदय सामंत यांनी प्रतिक्रिया दिली. एखादा पक्ष कमी होतो, त्या वेळेला आपल्या कार्यकर्त्यांना मोरल सपोर्ट देणे ही त्या नेत्याची जबाबदारी असते आणि तेच ठाकरे करत आहेत असे प्रत्युत्तर दिलं आहे.
तर आपल्याकडचे उरलेले आमदार, पदाधिकारी, कार्यकर्ते इकडे तिकडे जाऊ नये यासाठी उद्धव ठाकरे खटाटोप करत असल्याची टीका देखील त्यांनी केली. वंदनीय बाळासाहेबांचा विचार कोणाचा आहे, हे निवडणूक आयोगाने फायनल केलं आहे. त्यामुळे त्यांच्याकडील कोणी इकडे तिकडे होऊ नये म्हणून त्यांनी ही भूमिका मांडली असावी असंही सामंत म्हणाले.
Published on: Mar 31, 2023 11:03 AM
Latest Videos