धारावी परिसरातील झोपडपट्टीला आग; वांद्रे आणि ईस्टर्न एक्सप्रेसवेकडे जाणारी वाहतूक वळवली

धारावी परिसरातील झोपडपट्टीला आग; वांद्रे आणि ईस्टर्न एक्सप्रेसवेकडे जाणारी वाहतूक वळवली

| Updated on: Feb 22, 2023 | 9:22 AM

धारावी परिसरातील कमला नगर झोपडपट्टीला भीषण आग लागली आहे. त्यामुळे वाहतुकीत बदल करण्यात आले आहेत. पाहा...

धारावी परिसरातील कमला नगर झोपडपट्टीला भीषण आग लागली आहे. त्यामुळे वाहतुकीत बदल करण्यात आले आहेत. धारावीतील कमलानगरच्या आगीमुळे 90 फीट रोड बंद करण्यात आला आहे. ही वाहतूक रोहिदास मार्गाकडे वळवण्यात आली आहे. त्यामुळे वाहतूक संथ गतीनं सुरु आहे. टी जंक्शनपासून 60 फीट रोडवर जाण्याऐवजी रहेजा माहीमकडे वाहतूक वळवण्यात आली आहे. मुंबईतील वांद्रे कुर्ला कॉम्प्लेक्स, तसंच ईस्टर्न एक्सप्रेसवेवरून अनेकजण पश्चिम उपनगरांच्या दिशेनं प्रवास करतात. त्यांना आज वाहतूक कोंडीचा सामना करावा लागत आहे. मुंबई ट्रॅफिक पोलिसांनी ट्विट करत ही माहिती दिली आहे. सध्या ही आग विझली असून घटनास्थळी फायर कुलिंगचं काम सुरू आहे.

Published on: Feb 22, 2023 09:21 AM