जय बेळगाव जय कर्नाटक विधानावर राजकिय वादंग; धीरज देशमुख यांनी व्यक्त केली दिलगिरी
बेळगाव येथील राजहंसगडावरील कार्यक्रमात धीरज देशमुख यांनी जय बेळगाव जय कर्नाटक असं म्हटलं होतं. त्यावर राजकीय वादंग उठल्यानंतर देशमुख यांनी दिलगिरी व्यक्त केली आहे
बेळगाव : येथील राजहंसगडावरील छत्रपती शिवाजी महाराजांच्या ३६ फुटांच्या पुतळ्याचे अनावरण करण्यात आले होते. या कार्यक्रमाला लातूर ग्रामीण आमदार धीरज देशमुख, माजी मंत्री सतेज पाटील आणि संभाजीराजे छत्रपती उपस्थित होते. कर्नाटकात छत्रपती शिवरायांच्या पुतळ्याची वारंवार विटंबना होत होती आणि त्यावर मोठ्या प्रमाणात राज्यात राजकीय वातावरण गरम झाले होते. असे असतानाही धीरज देशमुख यांनी जय बेळगाव जय कर्नाटक असं म्हटलं होतं. त्यावर राजकीय वादंग उठल्यानंतर आणि भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी टीका केल्यानंतर आता धीरज देशमुख यांनी दिलगिरी व्यक्त केली आहे. यावेळी त्यांनी माझ्या भाषणाचा चुकीचा अर्थ लावू नये असेही म्हटलं आहे. तसेच कोणाच्या भावना दुखावल्या असतील तर दिलगिरी व्यक्त करतो असेही ते म्हणाले.
Published on: Mar 06, 2023 08:08 PM
Latest Videos