कसबा पोटनिवडणुकीत पैसे वाटल्याचा काँग्रेसचा आरोप; धीरज देशमुख म्हणाले, आता...

कसबा पोटनिवडणुकीत पैसे वाटल्याचा काँग्रेसचा आरोप; धीरज देशमुख म्हणाले, आता…

| Updated on: Feb 25, 2023 | 12:13 PM

कसबा पोटनिवडणुकीत पैसे वाटल्याचा आरोप काँग्रेसच्या वतीने करण्यात आले आहेत. यावर काँग्रेसचे आमदार धीरज देशमुख यांनीही आपली प्रतिक्रिया दिली आहे. पाहा ते काय म्हणालेत....

पुणे : कसबा पोटनिवडणुकीत पैसे वाटल्याचा आरोप काँग्रेसच्या वतीने करण्यात आले आहेत. यावर काँग्रेसचे, लातूर ग्रामीणचे आमदार धीरज देशमुख यांनीही आपली प्रतिक्रिया दिली आहे. “कसबा पोटनिवडणुकीत पैसे वाटले जात असतील तर हे गंभीर आहे. निवडणूक आयोगानं यावर कारवाई करावी. निवडणूक काळात सगळा कारभार हा निवडणूक आयोगाकडे असतो. त्यामुळे निवडणूक आयोगानं कारवाई करावी, अशी मागणी धीरज देशमुख यांनी केली आहे.काँग्रेसच्या अधिवेशनात सोनिया गांधी ,राहुल गांधी यांच मार्गदर्शन मिळणार आहे. भारत जोडो यात्रेनंतर कार्यकर्त्यांमध्ये उत्साह आहे.काँग्रेस हाच एकमेव देशाला दिशा देणारा पर्याय आता आहे, असंही धीरज देशमुख म्हणालेत.

Published on: Feb 25, 2023 12:13 PM