धुळेकरांना आता हरणमाळ धरणाचाच आधार? काय आहे कारण? नकाने तलावाचं काय झालं?

धुळेकरांना आता हरणमाळ धरणाचाच आधार? काय आहे कारण? नकाने तलावाचं काय झालं?

| Updated on: May 25, 2023 | 10:12 AM

यादरम्यान आता धुळे शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या नकाने तलावामध्ये अवघे नऊ दिवस पाणीसाठा शिल्लक राहिला आहे. कडाक्याच ऊन पडल्यामुळे बाष्पीभवनाचा वेग वाढला आहे. ज्यामुळे जलसाठा झपाट्याने कमी झाला आहे.

धुळे : धुळे शहरातील नागरिकांसाठी एक महत्वाची बातमी आहे. तर त्यांना आता पाण्यासाठी दुसऱ्या धरणावर अवलंबून राहावं लागणार आहे. कारण आता मे महिना संपत आला असून अजून अवकाळीचा पत्ता नाही. त्यात मान्सून कधी सुरू होणार याचे फक्त अंदाज व्यक्त केले जात आहेत. यादरम्यान आता धुळे शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या नकाने तलावामध्ये अवघे नऊ दिवस पाणीसाठा शिल्लक राहिला आहे. कडाक्याच ऊन पडल्यामुळे बाष्पीभवनाचा वेग वाढला आहे. ज्यामुळे जलसाठा झपाट्याने कमी झाला आहे. त्यामुळे धुळेकरांना आता पाणी पुरवठ्यासाठी हरणमाळ धरणातील पाण्यावर निर्भर राहावे लागणार आहे. धुळे शहरातील अर्ध्या भागाला नकाने तलावातून पाणीपुरवठा केला जातो. मात्र आता जलसाठा अत्यल्प शिल्लक राहिल्यामुळे महानगरपालिका प्रशासनाला पर्यायी उपाययोजना कराव्या लागणार आहेत. आधीच तांत्रिक अडचणींमुळे धुळे शहरात कृत्रिम पाणीटंचाई निर्माण झाले असताना, आता पुन्हा तलावाचं पाणी कमी झाल्यामुळे अधिकची कसरत धुळेकर नागरिकांना पाण्यासाठी करावी लागणार आहे.

Published on: May 25, 2023 10:12 AM