धुळ्यातील शेतकऱ्यांची चिंता मिटली; पांढऱ्या सोन्याचे भाव वाढले
गेल्या चार महिन्यांपासून कापसाचे दर हे 8000 च्या पुढे जात नव्हते. शेतकऱ्यांना अपेक्षा होती की कापसाचे दर हे दहा हजार रुपये प्रति क्विंटलपर्यंत जातील. मात्र दर वाढत नसल्याने शेतकऱ्यांमध्ये निराशा पसरली होती
धुळे : राज्यातील शेतकरी हा अवकाळी पाऊस आणि गारपिटीमुळे त्रस्त झाला असताना धुळे जिल्ह्यातीस शेतकऱ्यांसाठी मात्र आनंदाची बातमी समोर आली आहे. पांढरे सोनं म्हणून ओळख असणाऱ्या कापसाला आता चांगले भाव मिळणार आहेत. प्रति क्विंटल मागे कापसाचे दर 700 ते 1000 रुपये वाढले आहेत. ज्यामुळे धुळ्यातील शेतकरी आनंदी दिसत आहे. धुळे जिल्ह्यातील बहुतांश शेतकऱ्यांनी आपला कापूस घरात सांभाळून ठेवला होता. गेल्या चार महिन्यांपासून कापसाचे दर हे 8000 च्या पुढे जात नव्हते. शेतकऱ्यांना अपेक्षा होती की कापसाचे दर हे दहा हजार रुपये प्रति क्विंटलपर्यंत जातील. मात्र दर वाढत नसल्याने शेतकऱ्यांमध्ये निराशा पसरली होती. आता मात्र गेल्या काही दिवसांपासून आंतरराष्ट्रीय बाजारपेठेमध्ये कापसाची मागणी वाढल्याने दर चांगले मिळत आहेत.
Latest Videos