‘डायल 112’चा असाही वापर; चक्क पोलिसांनाच धमकी, पोलिस ‘ॲक्शन मोड’मध्ये

‘डायल 112’चा असाही वापर; चक्क पोलिसांनाच धमकी, पोलिस ‘ॲक्शन मोड’मध्ये

| Updated on: Apr 07, 2023 | 8:45 AM

एका अज्ञात व्यक्तीने यशोधरानगर पोलिस ठाणेच बॉम्बने उडवून देण्याची धमकी ‘डायल 112’वरून दिली. त्यामुळे परिसरातील नारिकांना पोलिसांची धावपळ पहायला मिळाली

नागपूर : ‘डायल 112’ नंबर हा लोकांच्या समस्या लवकर पोलिसांपर्यंत जाव्यात यासाठी आहे. मात्र नागपूरात याच नंबरवर एक फोन आल्याने खळबड उडाली आहे. तर त्या फोनमुळे चक्क पोलिसानांच घाम फुटण्याची वेळ आली. त्यामुळे पोलिस तर ‘ॲक्शन मोड’मध्ये आलेच आहेत. मात्र या फोन कॉलची नागपूरात जोरदार चर्चा सुरू आहे.
एका अज्ञात व्यक्तीने यशोधरानगर पोलिस ठाणेच बॉम्बने उडवून देण्याची धमकी ‘डायल 112’वरून दिली. त्यामुळे परिसरातील नारिकांना पोलिसांची धावपळ पहायला मिळाली. तर हा फोन पोकळ धमकीचाच असल्याचे समोर आले आहे. तर आपल्या तक्रारीवर पोलिसांनी योग्य कारवाई केली नाही म्हणत अज्ञात व्यक्तीचा फोन आला. त्यानेच पोलिसांनाच बॉम्बने उडविण्यात येईल, अशी धमकी दिली. त्यामुळे पोलिसांची डोकेदुखी वाढली होती.

Published on: Apr 07, 2023 08:45 AM