बच्चू कडू यांनी पवारांना चहापाण्याला बोलवून टायमिंग साधलं ? स्पेशल रिपोर्ट पाहा
प्रहार संघटनेचे अध्यक्ष अपक्ष आमदार बच्चू कडू यांनी राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नेते शरद पवार यांना आपल्या घरी चहापाना बोलवून महायुतीच्या पोटात गोळा आणला आहे. या मागे बच्चू कडू यांनी लोकसभेच्या जागांसाठी महायुतीचे नेते देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे यांच्यावर दबाव टाकल्याचे बोलले जात आहे.
अमरावती | 29 डिसेंबर 2023 : अमरावती दौऱ्यावर असलेले राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार हे आमदार बच्चू कडू यांच्या निमंत्रणावरून त्यांच्या घरी चहापानाला गेल्याने महायुतीत चलबिचल झाली आहे. जवळपास पंधरा मिनिटे शरद पवार आणि बच्चू कडू यांच्या चर्चा झाली. मात्र, बच्चू कडू या निर्णयाद्वारे महायुतीवर दबाब टाकत तर नाही ना अशी चर्चा सुरु आहे. सूत्राकडील माहीतीनूसार लोकसभेसाठी अमरावती, वर्धा, जळगाव आणि जालना या चार जागांसाठी बच्चू कडू इच्छुक आहेत. अमरावतीतून नवनीत राणा खासदार आहेत. राष्ट्रवादीने 2019 मध्ये त्यांच्यासाठी जागा सोडली होती. आता राणांचा कल भाजपाकडे आहे. वर्ध्याची जागेवर भाजपाचे रामदास तडस खासदार आहेत. जालनाता भाजपाचे रावसाहेब दानवे खासदार आहेत. जळगावातही भाजपाचे खासदार उन्मेश पाटील खासदार आहेत. भाजपाच्या तीन स्टॅंडींग जागांवर त्यांची नजर आहे. बच्चू कडू यांनी सत्ताधारी पक्षाचे अपक्ष आमदार आहेत. शिंदे यांच्या मंत्रिमंडळात त्यांना स्थान मिळाले नाही. त्यांना दिव्यांग कल्याण विभागाचे अध्यक्ष पद दिले. या प्रकरणी विरोधी पक्ष नेते विजय वडेट्टीवार यांनी दहा तारखेच्या निकालानंतर नवा नवरदेव मुख्यमंत्री होणार हे बच्चू कडूंना समजले असेल असा टोला लगावला आहे. बच्चू कडू प्रहार संघटनेद्वारे आपले राजकारण करीत असून अमरावतीत त्यांचे दोन आमदार आहेत. आता लोकसभेसाठी जागा जागा पदरात पाडून घेण्याची त्यांची योजना असल्याचे म्हटले जाते.