Ashok Chavan News : खरंच अशोक चव्हाणांनी भाजपला मदत केली? कोणी दिली चव्हाणांना भाजपमध्ये येण्याची ऑफर? पडद्यामागून मदत केल्याने कोणी मागितले जाहीर आभार
Ashok Chavan offer : काँग्रेसचे नेते आणि माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी भाजपला मदत केल्याचा कोणी केला आरोप ? कोणी दिली त्यांना भाजपात येण्याची ऑफर?
Chikhalikar on Ashok Chavan : “अशोकरावांनी (Ashok Chavan) काल भारतीय जनता पक्षाला (Bhartiya Janta Party) जाहीर मदत केली. विधानसभेत शिंदे सरकारच्या बहुमत चाचणीच्यावेळी काँग्रेसच्या चार आमदारांना (Congress Four MLA) येऊ दिलं नाही. आता यापेक्षा आणखी कोणता मोठा पुरावा हवाय.” असा मोठा गौप्यस्फोट भारतीय जनता पक्षाचे नांदेडचे खासदार प्रताप पाटील चिखलीकर (MP Pratap Patil Chikhalikar) यांनी केला. त्यांनी बहुमत चाचणीवेळी चव्हाण साहेब का अनुपस्थितीत राहिले आणि त्यांच्यामुळे काँग्रेसचे कोणते आमदार बहुमत चाचणीवेळी अनुपस्थिती राहिले याचं गणितंच मांडलं. त्यांच्या या आरोपाला आता चव्हाण काय उत्तर देतायेत याकडे सर्वांचे लक्ष लागलं आहे.
मानले जाहीर आभार
“आपण बघितलं की, उद्धव साहेबांची शेवटची कॅबिनेट झाली, त्यात औरंगाबादचं संभाजीनगर आणि उस्मानाबादचं धाराशीव करण्याचा निर्णय झाला. ही मागणी कोणाची होती, बाळासाहेब ठाकरे यांच्या शिवसैनिकांची आणि भारतीय जनता पक्षाने ही मागणी केली होती. त्याही मागणीला अशोकरावांनी पाठिंबा दिला. त्यामुळे काल मुंबईत पत्रकार परिषद झाली, त्यात मी अशोकरावांचे आभार मानले.” असे वक्तव्य करुन चिखलीकरांनी चव्हाण यांची राजकीय अडचण करण्याचा प्रयत्न केला.
भाजपात आले तर स्वागत
“मला काही मित्रांनी विचारलं की, ते उद्या जर भाजपात आले तर, कोणी आलं तर मला काय फरक पडणार आहे. ते आलं तर माझं आणि माझ्या पक्षाचंच काम करतील. त्यामुळे कोणी यावं, कोणी येऊ नये असं काही बंधन नाही.” असं सागताना चिखलीकरांनी एकाच दगडात दोन पक्षी मारण्याचा प्रयत्न केला.
चव्हाण यांच्या सत्तेला हादरा
नांदेड जिल्ह्याची गेल्या अडीच वर्षात जी अडवणूक झाली ती या नवीन सरकारमध्ये होणार नाही. सगळ्यांनी एकत्र आल्यास नांदेडमध्ये नक्कीच बदल होईल असे सूतोवाच त्यांनी केले.